• लोकनेते माजी मंत्री स्व.संजय देवतळे यांचा स्मृतिदिन सोहळा संपन्न• निःशुल्क नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा हजारो लोकांनी घेतला लाभ• आयुष्यमान कार्ड वितरण कार्यक्रम पार पडलादैनिक जागर मराठी:प्रतिनिधी,वरोरा हिंदुस्तान न्यूज 24: रेखा चंडाले डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर वरोरा:महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक मंत्री लोकनेते स्व.संजय देवतळे यांचा चवथा स्मृतिदिन सोहळा २५ एप्रिल २०२५ ला सिध्दीविनायक मंगल कार्यालय वरोरा येथे सुसंपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मंत्री महसूल चंद्रशेखर बावनकुळे हे होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री,अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, हंसराज अहिर प्रमुख उपस्थिती मध्ये आमदार करण देवतळे,आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार सुभाष धोटे,डॉ.विजय देवतळे,स्वेताताई देवतळे,जिल्हाधिकारी गौडा, माजी जिल्हाधिकारी डोंगरे, सहा.जिल्हा पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा नयोमी साटम , रमेशराव राजूरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार करण देवतळे यांनी केले. संस्कारक्षम व विकासाला खरी दिशा देणारे व्यक्तिमत्व स्व.संजयबाबू देवतळे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्व.संजयबाबू देवतळे यांच्या चवथ्या स्मृतिदिनी उद्घाटनपर भाषणात बोलताना नामदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कोरोना काळात स्व.संजयबाबू यांचे निधन झाले.आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनावर परिणाम झाला.संजयबाबू गेले यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता.त्यांनी २० वर्ष वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्राची सेवा केली.क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधला.आपले संपूर्ण जीवन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवेत घालविले.विधानसभेमध्ये संजयबाबू भाषण द्यायचे किंवा ते विधानसभा पटलावर आपल्या भागाचे तारांकित प्रश्न मांडायचे तेव्हा इतर विधानसभा सदस्य त्यांच्या बोलण्यातील शब्द टीपायचे याचा अर्थ त्यांच्या भाषणात व बोलण्यात शब्दांची मुद्देसूद मांडणी असायची.मनुष्य किती जगला ,यापेक्षा कसा जगला आणि कोणासाठी जगला याला अर्थ आहे.सहा महिन्यापासून करण देवतळे आमदार आहे.आम्ही जेव्हा आमदार झालो तेव्हा विधानसभेतील कामकाज समजायला तीन वर्ष लागले.परंतु विधानसभा काय असते.कुठले प्रश्न मांडावे व कसे मांडावे याबद्दल त्यांना लवकरच अभ्यास झाला आणि त्यांनी क्षेत्रातील प्रश्न विधानसभेत मांडायला सुरुवातही लवकरच केली.त्यामुळे चांगले काम करणाऱ्या आमदारांमध्ये आमदार करण देवतळे यांचा नंबर लागतो. स्व.संजयबाबु यांच्या सुसंस्कृत संस्कार त्यांच्या अंगी आहे.जनतेनी आमदार करण देवतळे यांच्या पाठीशी भरभक्कम उभे राहावे.प्रधानमंत्री,मुख्यमंत्री आणि मी त्यांच्या आणि देवतळे परिवाराच्या.पाठीशी उभे आहोत.असे विचार नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर ,आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार सुभाष धोटे,डॉ.विजय देवतळे,आमदार करण देवतळे आदींची भाषणे झालीत. स्मृतिदिनी प्रसंगी निःशुल्क नेत्र्तपासणी शस्त्रक्रिया शिबिर आणि आयुष्मान कार्ड वितरण करण्यात आले.शिबिराचा हजारो लोकांनी लाभ घेतला.

• लोकनेते माजी मंत्री स्व.संजय देवतळे यांचा स्मृतिदिन सोहळा संपन्न

• निःशुल्क नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा हजारो लोकांनी घेतला लाभ

• आयुष्यमान कार्ड वितरण कार्यक्रम पार पड

हिंदुस्तान न्यूज 24: रेखा चंडाले डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर 


वरोरा:महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक मंत्री लोकनेते स्व.संजय देवतळे यांचा चवथा स्मृतिदिन सोहळा २५ एप्रिल २०२५ ला सिध्दीविनायक मंगल कार्यालय वरोरा येथे सुसंपन्न झाला.
  कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मंत्री महसूल  चंद्रशेखर बावनकुळे हे होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री,अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, हंसराज अहिर   प्रमुख उपस्थिती मध्ये आमदार करण देवतळे,आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार सुभाष धोटे,डॉ.विजय देवतळे,स्वेताताई देवतळे,जिल्हाधिकारी गौडा, माजी जिल्हाधिकारी डोंगरे, सहा.जिल्हा पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा नयोमी साटम , रमेशराव राजूरकर यांची उपस्थिती होती.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार करण देवतळे यांनी केले.
   
  संस्कारक्षम व विकासाला खरी दिशा देणारे व्यक्तिमत्व स्व.संजयबाबू देवतळे,  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

  स्व.संजयबाबू देवतळे यांच्या चवथ्या स्मृतिदिनी उद्घाटनपर भाषणात बोलताना नामदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले  कोरोना काळात स्व.संजयबाबू यांचे निधन झाले.आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनावर परिणाम झाला.संजयबाबू गेले यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता.त्यांनी २० वर्ष वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्राची सेवा केली.क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधला.आपले संपूर्ण जीवन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवेत घालविले.विधानसभेमध्ये संजयबाबू भाषण द्यायचे किंवा ते विधानसभा पटलावर आपल्या भागाचे तारांकित प्रश्न मांडायचे तेव्हा इतर विधानसभा सदस्य त्यांच्या बोलण्यातील शब्द टीपायचे याचा अर्थ त्यांच्या भाषणात व बोलण्यात शब्दांची मुद्देसूद मांडणी असायची.मनुष्य किती जगला ,यापेक्षा कसा जगला आणि कोणासाठी जगला याला अर्थ आहे.सहा महिन्यापासून करण देवतळे आमदार आहे.आम्ही जेव्हा आमदार झालो तेव्हा विधानसभेतील कामकाज समजायला तीन वर्ष लागले.परंतु विधानसभा काय असते.कुठले प्रश्न मांडावे व कसे मांडावे याबद्दल त्यांना लवकरच अभ्यास झाला आणि त्यांनी क्षेत्रातील प्रश्न विधानसभेत मांडायला सुरुवातही लवकरच केली.त्यामुळे चांगले काम करणाऱ्या आमदारांमध्ये आमदार करण देवतळे यांचा नंबर लागतो. स्व.संजयबाबु यांच्या सुसंस्कृत संस्कार त्यांच्या अंगी आहे.जनतेनी आमदार करण देवतळे यांच्या पाठीशी भरभक्कम उभे राहावे.प्रधानमंत्री,मुख्यमंत्री आणि मी त्यांच्या आणि देवतळे परिवाराच्या.पाठीशी उभे आहोत.असे विचार नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

   याप्रसंगी  माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर ,आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार सुभाष धोटे,डॉ.विजय देवतळे,आमदार करण देवतळे आदींची भाषणे झालीत.
   स्मृतिदिनी प्रसंगी निःशुल्क नेत्र्तपासणी शस्त्रक्रिया शिबिर आणि आयुष्मान कार्ड वितरण करण्यात आले.शिबिराचा हजारो लोकांनी लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments