उर्जानगर जि. प.शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा..!**शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पारखी यांच्या हस्ते शेवटचे ध्वजारोहण*

*उर्जानगर जि. प.शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा..!*

*शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पारखी यांच्या हस्ते शेवटचे ध्वजारोहण*


हिंदुस्तान न्यूज 24: रेखा चंडाले डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर 
*चंद्रपुर :- येथील जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा, उर्जानगर (कोंडी) येथे मागील आठ वर्षापासून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी विराजमान असलेले संतोष पारखी यांनी आज दि. 01 मे 2025 रोज गुरुवारला सकाळी 8:00 वा. महाराष्ट्र दिनानिमित्य शाळेत शेवटचा ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला सलामी देवून राष्ट्रगान व महाराष्ट्र गीत गायनाने साजरा करीत शाळेतील विद्यार्थी यांचा निकाल जाहीर करण्यात येवून सर्व विद्यार्थीना गुणपत्रक देत खाऊ वाटप करीत महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.*
          
*सदर कार्यक्रमाला मुख्याधापक / सचिव सुधाकर धानोरकर, सदस्य नामन पवार, सदस्य नैताम, शिक्षक नांदे सर, वांढरे मॅडम, आदेवार मॅडम, गादेवार मैडम, मनोज तांडेकर व अल्कोल्हीक अँनानिमस सदस्य, गावकरी नागरिक, पालक आणि शाळेतील विद्यार्थी मुले व मुली उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृन्द, विद्यार्थी मुले व मुलींनी प्रयत्न केले.*

Post a Comment

0 Comments