अमराई अतिक्रमणातील घरा संदर्भात आ. किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन नागरिकांच्या घरांना हात लावू देणार नाही : आ. किशोर जोरगेवार

अमराई अतिक्रमणातील घरा संदर्भात आ. किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन 
नागरिकांच्या घरांना हात लावू देणार नाही : आ. किशोर जोरगेवार


घुग्घूस : येथील अमराई वॉर्डातील नागरिकांना तहसील कार्यालयातून मौजा घुग्घूस सर्वे क्रं 264 मधील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीस देण्यात आले आहे 
येत्या सात दिवसात अतिक्रमण स्वतःहुन न काढल्यास शासनाच्या वतीने अतिक्रमणातील घरे पाडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

यापरिसरात गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून गोरगरीब लोक वास्तव्य करीत असतात अचानकपने आलेल्या शासकीय नोटीसमुळे नागरिकांन मध्ये दहशत निर्माण झाली आहे.

याघटनेची गंभीरता लक्षात घेऊन तुलसी वृंदावन संस्थेचे अध्यक्ष महेंद्र बाग  यांनी भाजप नेते माजी उपसरपंच संजय तिवारी यांच्या उपस्तिथीत अमराई वॉर्ड क्रं 01 उडीया मोहल्ला येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आ. किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांना नागरिकांच्या समस्या सांगितले असता 
आ. जोरगेवार यांनी नागरिकांच्या घरांना हात लावू देणार नाही असे आश्वासन दिले तसेच 15 मार्च शनिवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावण्यात आली असल्याची माहिती देत जास्तीत - जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

अमराई वॉर्डातील अनेक नागरिकांना याप्रकारचे शासकीय कारवाईचे नोटीस देण्यात आहेत यापूर्वी नकोडा येथील जवळपास दीडशे घरांना ही नोटीस देण्यात आली आहे
घुग्घूस येथील जवळपास 1100 घरांना नोटीस देण्यात येणार असल्याचे कळत आहे.. भारतीय जनता पार्टी महिला पदाधिकारी
सुचिता ताई लूटे माजी ग्रा.प. सदस्या, सुनीता ग़वई, सुनीता पाटिल राजेंद्र लुटे. प्रामुख्याने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments