वरोरा तालुका धनोजे कुणबी महिला आघाडी द्वारे जागतिक महिला दिन साजरा

वरोरा तालुका धनोजे कुणबी महिला आघाडी द्वारे जागतिक महिला दिन साजरा

घुग्घूस

 वरोरा तालुका धनोजे कुणबी महिला आघाडी आणि धनोजे कुणबी भिशी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन आणि भिशी कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 8 मार्च 2025 ला  करण्यात आले होते.


कार्यक्रमाची सुरवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व मां जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरोरा तालुका धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. संगीता घुगल तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयुर्वेदाचार्य डॉ. मोनिका डाहुले यांनी या होत्या. डॉ मोनिका यांनी महिला आरोग्य आणि सक्षमीकरणावर मोलाचे मार्गदर्शन करून महिलांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदाचे महत्त्व विशद केले. या प्रसंगी टि.व्ही.डिश चालक महिला मनीषा नन्नावरे व वर्षा वाढई यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला डाॅ. सौ. मायाताई राजूरकर (सेवानिवृत्त शिक्षिका,वरोरा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रास्ताविक स्मिता सोनेकर यांनी केले. महिलांसाठी मनोरंजक खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामुळे कार्यक्रमात रंगत आली. उपस्थितांसाठी चविष्ट अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सौ. सीमा जोगी तर आभार प्रदर्शन सौ. योगिता हेपट यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता धनोजे कुणबी महिला आघाडी व भिशी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद लाभला.

Post a Comment

0 Comments