*शेखर गोलेटीवार यांना उपचारासाठी केली 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत.!!*
*एटापल्ली:-* सर्वत्र होळी व धुलिवंदनचा आनंद धूम धडक्यात साजरा होत असताना.तालुक्यातील स्थानिक युवक कु.शेखर गोलेटीवार वय-18 वर्षे यांचा काल प्रवासा दरम्यान अपघात झाला,त्यांच्या छाती व डोक्याला जब्बर जख्म झाली.त्यांची प्रकृती अत्यंत चिंता जनक असल्याने त्यांला गडचिरोली येथील रुग्णालयात पाठवण्यात आले.पण तिथे त्यांच्या प्रकृती मध्ये सुधार होत नसल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालय पाठवायची गरज होती.
पण घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली होती.त्यामुळे संपूर्ण कुटूंब चिंतेत होत,पुढील उपचार कसा होणार? हा प्रश्न कुटूंबातील सदस्यांना उद्भवतं होता.पण ही माहिती अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या कानी पडली,त्यावेळी राजे साहेबांनी गोलेटीवार कुटूंबातील सदस्यांना बोलावून त्यांची आस्थेने विचारपूस केली आणि त्यांना मदतीचा हात देत,पुढील उपचारासाठी 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत केली.यामुळे गोलेटीवार कुटूंबाला खूप मोठा आधार झाला.
समस्त गोलेटीवार कुटूंबाने यावेळी त्यांचे हृदय पूर्वक आभार मानले.!🙏
0 Comments