कोरपणा येथील पांडुरंग वरभे राजलक्ष्मी गारमेंट्सला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; लाखोंचे नुकसान
कोरपना : येथील पांडुरंग वरभे यांच्या राजलक्ष्मी गारमेंट्स या कापड दुकानाला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना 30 जुलै रोज गुरुवारला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान घडली. आग लागल्यानंतर दुकानातील कपडे व इतर साहित्याने तत्काळ पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत दुकानातील मोठ्या प्रमाणात तयार कपडे, कापड व इतर साहित्य जळून खाक झाले. या आगीत अंदाजे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग शार्ट सर्किट मुळे लागली याची प्राथमिक माहिती शॉर्टसर्किट असल्याचे समोर आले असून संबंधित यंत्रणेकडून अधिक तपास सुरू आहे.
0 Comments