• चंद्रपूरात सहयोग प्रशिक्षण शिबीर संपन्न! 
• अनेकांची शिबीराला उपस्थिती! हिंदुस्तान न्यूज़ 24:रेखा चंडाले 
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपुर 

चंद्रपूर  : पतंजली योग समिती, पतंजली किसान योग समिती,भारत स्वाभिमान,व युवा भारत चंद्रपूरच्या वतीने आज सोमवार दि. 20.04.26  सहयोग प्रशिक्षण  शिबीर पार पडले.

सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीरच्या 16 व्या दिवशी वैजयंती गहुकर व मंगला भटपल्लीवार यांनी योगा क्लाॅस घेतला.

 शिबीराच्या प्रारंभी ओंकार गायत्री मंत्राने योग क्लाॅसची सुरुवात करून सर्वप्रथम योग प्राणायाम भस्त्रिका,  कपालभाती, बाह्य प्राणायाम ,अग्निसार,अनुलोम विलोम, भ्रामरी, उदगीत, शीतली, शीतकारी प्राणायाम आदिंची प्रात्यक्षिके करून दाखविली व नंतर त्यांच्या कडून ते करवून घेतले.

संगीतच्या तालावर हातापायाचे व्यायाम, योग जॉगिंग, कमरेचे व्यायाम, मानेचे व्यायाम आदिंची माहिती त्यांना दिली.
सर्व योग साधक व साधिका,तसेच प्रशिक्षणार्थी यांना या दरम्यान नवीन अनुभवाचे शिक्षण मिळाले. 
आजचा योगा क्लाॅस हा इत्तर क्लाॅस पेक्षा सुरेख झाला अशी प्रतिक्रिया उपस्थित मंडळींनी दिली. 
शेवटी शांतीपाठ घेऊन या योगा क्लाॅसची सांगता झाली. 
चंद्रपूरच्या योग शिक्षिका वैजयंती विकास गहूकर  व मंगला भटपल्लीवार यांनी  योगा क्लाॅस घेतल्या बद्दल त्यांचा या वेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शिबीराला जिल्हा प्रभारी सुधाकर श्रीपुरवार, महामंत्री अशोक पूर्णये सहप्रभारी रमेश ददगल ,सहप्रभारी प्रकाश कासर्लेवार, महामंत्री मधुकर राजूरकर, कोषाध्यक्ष मुरलीधर शिरभये , मिडिया प्रभारी प्रकाश राठोड,  प्रभाकर राजूरकर ,विलास  वनकर ,वर्षा पाटील , सविता कोट्टी व ज्येष्ठ नागरिक संघाचे  गणपत येवले, अशोक उरकुडे व सर्व योग साधक व साधिका उपस्थित होते.
आज संपन्न झालेल्या योग प्रशिक्षण शिबीरात अंदाजे 75 ते 80 योग साधक व साधिकांनी आपला  सहभाग नोंदविला! 
परत असे सहयोग प्रशिक्षण आयोजकांनी आयोजित करावे असे मत अनेकांनी या वेळी व्यक्त केले.