सपना कुंभारेंना “महाराष्ट्र रत्न " सन्मान पुरस्कार घोषीत

सपना कुंभारेंना 
“महाराष्ट्र रत्न " सन्मान पुरस्कार घोषीत
हिंदुस्तान न्यूज़ 24: रेखा चंडाले 
जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर 


विविध क्षेत्रात आपल्या अमुल्य व उल्लेखनीय कामगिरीची मोहर उमटविणाऱ्या  चंद्रपूर जिल्ह्यातील सपना कुंभारे यांची राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न २०२६ या सन्मान पुरस्कारसाठी  निवड करण्यात आली आहे. तेजस सेवा प्रतिष्ठानतर्फे हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.त्यांच्या या सन्मान पुरस्कारामुळे चंद्रपूर जिल्ह्याची  मान उंचावली आहे.
सांगमनेर,जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
समाजातील विविध क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा मानाचा प्रतिष्ठित सन्मान पुरस्कार दिला जातो.
सपना कुंभारे यांनी समाजहितासाठी सातत्याने केलेले कार्य, सामाजिक परिवर्तनासाठी दिलेले योगदान व आदर्श कार्यपद्धती याची दखल घेऊन निवड समितीने त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
 या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल झाले आहे.
◼️महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं परिवार तर्फे मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे, कवयित्री शैला चिमड्यालवार, साधना धकाते, संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार, विद्या पिंजरकर, चंदा कामडी, चैताली आतराम, मंगल मिसाळ, हिमानी वाकुडकर, स्नेहा मडावी, कविता दिकोंडवार, संजीवनी धांडे,पुनम वासाडे,प्रा.राजश्री पाटील,प्रा.वैशाली राऊत , पुजा पाटील, अर्चना समर्थ, प्रेरणा सहारे, रजनी रणदिवे,रजनी रामटेके, अर्चना आमटे आदिंनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments