"आनंद निकेतन ज्युनियर कॉलेजचा 'टेक्नोवा' स्पर्धेत विजय"
वरोरा- आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाने, सेंट व्हिन्सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नागपूर येथे आयोजित "टेक्नोवा" स्पर्धेत पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत ३९ शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते, जी विशेषतः ११वी आणि १२वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत आनंद निकेतन ज्युनियर कॉलेजने १२० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. १२वी विज्ञान शाखेच्या गौरवी शिवारकर हिने सर्व ३९ शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तर नयन उपरे ह्याने महाविद्यालयीन स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला.विजेत्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी डॉ. विजय वाढई, प्राचार्य, सेंट व्हिन्सेंट पॅलोती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नागपूर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. त्याचप्रमाणे प्रा. निलेश जोशी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.या स्पर्धेचे आयोजन डॉ. सुरेश रांगणकर, विभागप्रमुख, बी. व्होक विभाग आणि त्यांच्या टीमने केले होते.या यशाबद्दल डॉ. विकास आमटे, सचिव, महारोगी सेवा समिती आनंदवन, वरोरा, डॉ. एम. सी. काळे, प्राचार्य, सौ. राधा सावने, उपप्राचार्य आणि आनंद निकेतन ज्युनियर कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments