महाराष्ट्र दिनानिमित्त राजुरा तहसील कार्यालयात आमदार देवराव भोंगळे केले ध्वजारोहण दैनिक जागर मराठी:शंकर महाकाली

महाराष्ट्र दिनानिमित्त राजुरा तहसील कार्यालयात आमदार देवराव  भोंगळे केले ध्वजारोहण 

दैनिक जागर मराठी:शंकर महाकाली 
हिन्दुस्थान न्यूज 24: रेखा चंडाले डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर 


राजुरा:महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त राजुरा येथील तहसील कार्यालयात आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण केले. 

आपला महाराष्ट्र हा सर्वात प्रगत, पुरोगामी व सुधारणावादी विचारांचा राज्य म्हणून ओळखल्या जात आहे. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि सहकार अशा सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड कायम राखत ‘विकसित राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण होईल यासाठी आपण सर्वांनी आज संकल्पबद्ध झालं पाहीजे, असे आवाहन करीत माझ्या महाराष्ट्रासाठी कष्ट घेतलेल्या, लढलेल्या, झगडलेल्या आणि या राज्याच्या उभारणीमध्ये योगदान दिलेल्या प्रत्येकाला महाराष्ट्र दिनी प्रणाम करतो अशी भावना याठिकाणी वक्त केली. 

या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसिलदार ओमप्रकाश गोंड, नायब तहसिलदार  तेलंग, तालुका कृषी अधिकार पायघन, भाजपचे शहराध्यक्ष सुरेश रागीट, महामंत्री मिलिंद देशकर, राधेश्याम अडाणीया, गणेश रेकलवार, सुरेश धोटे, विलास बोनगीरवार, संजय उपगण्लावार, उमाकांत धोटे, दिलिप गिरसावळे, उमेश मारशेट्टीवार, गणेश वाघमारे, छबिलाल नाईक, महेश रेगुंडवार, माया धोटे, योगिता भोयर, स्वरूपा झंवर, आसिफ सय्यद, सागर भटपल्लीवार, गणेश बेले, अश्विनी कोकोडे, मंगला हांडे आदिंसह नागरिकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments