• धानोरा बंधाऱ्यासाठी नागपूर येथे निर्णायक बैठक; आमदार किशोर जोरगेवार यांचा पुढाकार• कामाला मिळणार गती, आमदार जोरगेवार यांनी केल्या महत्वपूर्ण सूचना !

• धानोरा बंधाऱ्यासाठी नागपूर येथे निर्णायक बैठक; आमदार किशोर जोरगेवार यांचा पुढाकार

• कामाला मिळणार गती, आमदार जोरगेवार यांनी केल्या महत्वपूर्ण सूचना ! 
हिन्दुस्थान न्यूज 24: रेखा चंडाले डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर 

चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या धानोरा बंधाऱ्याच्या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्या वतीने नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, मुख्य अभियंता  रवी पराते, अधीक्षक अभियंता माधव कदम, कार्यकारी अभियंता वऱ्हाडे साहेब तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत प्रस्तावित धानोरा बंधाऱ्याच्या कामाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीला धानोरा बंधाऱ्याच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पाच्या आगामी टप्प्यातील कामकाज, तांत्रिक अडचणी, डीपीआरच्या अंतिम प्रक्रियेबाबत सखोल चर्चा झाली. डीपीआर अंतिम करून लवकरच हाय पावर कमिटीकडे प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते प्रकाश देवतळे, मनोज पाल, कारण नायर आदींची उपस्थिती होती. 
बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणतीही ढिलाई होऊ नये यावर जोर दिला. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याच्या ठोस सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी दिल्या. धानोरा बंधारा प्रकल्प हा केवळ सिंचनाची गरज भागवणारा प्रकल्प नसून, परिसरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवणारा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सदर बंधाऱ्याच्या कामाला गती देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. सदर विषयावर अनेकदा अधिवेशनात आवाज उठवत त्यांनी या महत्त्वाच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. परिणामी, या प्रकल्पाच्या डीपीआरसाठी ५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
धानोरा बंधाऱ्याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होईल, तसेच गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होईल. त्यामुळे या प्रकल्पाला वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली असून कामाला गती देण्यासंदर्भातील अनेक मोठे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. सदर बैठकीस संबंधित अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments