CBSE दहावी परीक्षेत 96% गुणांसह अमन जयपुरकर यशस्वी सुतार समाजाच्यावतीने सत्कार; पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव

 CBSE दहावी परीक्षेत 96% गुणांसह अमन जयपुरकर यशस्वी


सुतार समाजाच्यावतीने सत्कार; पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव



हिंदूस्थान न्युज 24: पुंडलिक येवले

तालुका प्रतिनिधी, भद्रावती




    भद्रावती : CBSE दहावीच्या परीक्षेत 96% गुण मिळवत येथील चि. अमन गीता प्रदीप जयपुरकर याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून सुतार समाजाच्या वतीने त्याचे तसेच त्याच्या पालकांचे मनापासून अभिनंदन करण्यात आले.

अमन जयपुरकर याने कठोर परिश्रम, चिकाटी आणि नियमित अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे भद्रावती शहराचे नाव उज्ज्वल झाले असून इतर विद्यार्थ्यांसाठीही तो प्रेरणादायी ठरला आहे.

    सुतार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी अमन व त्याच्या पालकांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा दिल्या आहेत. अमनने भविष्यातही असेच यश संपादन करून समाज व देशाचे नाव उंचावावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments