डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे मोफत थंड पाण्याची सेवा
हिंदुस्तान न्यूज 24: रेखा चंडाले
जील्हा प्रतिनिधी, चन्द्रपुर
बल्लारपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बल्लारपूर शहरात अभिवादनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी नगरपालिका चौकात गर्दी केली. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ हा संदेश जपत श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब यांच्या वतीने थंड पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली.
जयंती निमित्त वंदनासाठी आलेल्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले. उष्णतेच्या तीव्रतेमध्ये ही सेवा नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली.
या उपक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर यांच्यासह नगरसेवक मोहित डांगोरे, सुधाकर सिक्का, कमल वर्मा, आलोक साळवे, रोहित तोकाल, विनोद कोवे, मिलाप, चक्कु भैया, सुरज गोंगले, शुभम जनगम आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments