कॉलरी वॉर्ड, वरोरा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न
वरोरा / प्रतिनिधी
कॉलरी वॉर्ड, वरोरा येथील कल्याणेश्वर हनुमान मंदिर परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाले. या संमेलनाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्राम दिंडी काढून धार्मिक वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना व उद्बोधनपर कार्यक्रम पार पडले.
या संमेलनात संत आशीर्वचनासाठी इंजिनियर उदयपाल वणीकर महाराज (राष्ट्रीय प्रबोधनकार, कीर्तनकार) यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख वक्ते म्हणून अतुल नंदकिशोर शेंडे (विवेक विचारमंच, विदर्भ प्रांत संयोजक) यांनी मार्गदर्शन करताना हिंदू संस्कृती, एकता व सामाजिक बांधिलकी यावर विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष घुमे यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी व ओघवते संचालन माया बजाज यांनी केले. त्यांच्या सुस्पष्ट सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
या कार्यक्रमाचे संयोजक संजय दानव यांचीही मंचावर उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन सुबकपणे पार पडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरसेविका मनिषा दानव, छाया चव्हाण, ज्योती किटे तसेच प्रशांत साळवे, सुनील इंगळे, प्रफुल मांदाडे, नूतन बुरडकर, सार्थक नागपुरे यांनी अथक परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला. शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
या विराट हिंदू संमेलनामुळे परिसरात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचा संदेश देण्यात आला

0 Comments