सिदुर येथे रघुवीर अहीर यांचे शुभहस्ते पार पडलेसिमेंट काॅंक्रीट रोड व नाली बांधकामाचे भूमीपुजन

सिदुर येथे रघुवीर अहीर यांचे  शुभहस्ते पार पडले
सिमेंट काॅंक्रीट रोड व नाली बांधकामाचे भूमीपुजन
हिंदुस्तान न्यूज़ 24: रेखा चंडाले 
जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर 

चंद्रपूर: सिदुर ता. चंद्रपूर येथील गावाच्या मधोमध असलेला मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने नागरीकांना जाणे-येणे करण्यास त्रास सहन करावा लागत होता. याबाबत सिदुर येथील नागरीकांनी सदर समस्या पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना प्रत्यक्ष भेटून सांगितली  व हंसराज अहीर यांचे प्रयत्नाने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत श्री उमाले यांचे घर ते दषरथ भोयर  यांचे घरापर्यंत सिमेंट काॅंक्रीट रोड व नालीचे  बांधकाम मंजूर करण्यात आले. सदर कामाचे भुमीपूजन भाजपा युवा नेते रघुवीर अहीर यांचे शुभहस्ते आज दि. 19 एप्रिल रोजी  मोठ्या उत्साहात पार पडले. गावांच्या विकासाच्या बाबतीत हंसराज अहीर नेहमीच प्रयत्नशील असतात व त्यांच्या मार्गदर्शनात खनिज विकास निधीअंतर्गत तालुक्यातील बरीच विकास कामे मार्गी लागली असल्याचे प्रतिपादन रघुवीर अहीर यांनी केले. याप्रसंगी गावकऱ्यांनी  रघुवीर अहीर यांचा शाल  व पुष्पगुच्छ  देत सत्कार करीत आभार मानले.
याप्रसंगी सिदुर च्या सरपंच मंजुशा मत्ते, भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष सुनिल इग्र्रपवार, बुथ प्रमुख नामदेव येरगुडे, दिवाकर निखाडे, मारोती निखाडे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच किसन काटवले, रामदास आगरे, बाळु मत्ते, सुरज उईके, कानोबा गणफडे, मारोती निखाडे, गोलु उलमाले, मनोज मत्ते, सुरेष थेरे यांच्यासह गावातील भाजप कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रस्ता बांधकामामुळे गावातील दळणवळण सुलभ होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उपस्थित मान्यवरांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कामांची आवश्यकता  असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या समारोप सर्वांच्या उपस्थितीत उत्साहपुर्ण वातावरणात करण्यात आला.

Post a Comment

0 Comments